Divyang E Rickshaw Scheme 2024 list out – दिव्यांग व्यक्तींना (अपंग व्यक्तींना) आर्थिक स्वावलंबनासाठी ई-रिक्षा वाटप करण्याची योजना 2024 साठी सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत, ज्यांनी यापूर्वी अर्ज केले होते, त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लाभार्थ्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे . या लेखात आपण खालील गोष्टींची सविस्तर माहिती घेणार आहोत, लाभार्थ्यांची यादी कशी डाउनलोड करावी? तुमचं नाव यादीत आहे का, हे कसे तपासायचे?
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2024 म्हणजे काय ? | Divyang E Rickshaw Scheme 2024 list out
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2024 ही महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेद्वारे हरित ऊर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनांच्या स्वरूपात व्यवसाय उभारण्यासाठी प्रति लाभार्थी ₹3.75 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांना वाहनाची प्रादेशिक परिवहन विभागाकडून (RTO) नोंदणी करून देण्यात येईल. त्यांना व्यवसायासाठी आवश्यक ते प्राथमिक प्रशिक्षणही दिले जाईल. संबंधित संस्थांनी वाहनाची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे, तसेच वाहनाचा विमा उतरवणे ही जबाबदारी पार पाडावी लागेल. लाभार्थ्यांना व्यवसायाचा परवाना मिळवून देण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीशी समन्वय साधला जाईल. जर लाभार्थ्याला वाहन चालविण्यास परवाना मिळाला नाही, तर त्यांच्या वतीने सामान्य व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवाना मिळवून देण्यात येईल. ही योजना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविली जाईल. पर्यावरणपूरक आणि स्वावलंबी जीवनशैलीसाठी ही योजना दिव्यांगांसाठी नवा मार्ग निर्माण करते.
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2024 लिस्ट कशी डाऊनलोड कराल?
दिव्यांग ई-रिक्षा योजना 2024 अंतर्गत लाभार्थ्यांची यादी evehicleform.mshfdc.co.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील प्रक्रिया सोपी व सुलभ आहे:
- वेबसाईटला भेट द्या:
- evehicleform.mshfdc.co.in या वेबसाईटवर जा.
- लाभार्थी यादीचा पर्याय निवडा:
- मुख्य पानावर “See Beneficiary List” असा पर्याय दिला आहे, त्यावर क्लिक करा.
- डिव्हिजन व जिल्हा निवडा:
- तुमचा डिव्हिजन (कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर) निवडा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा.
- लिस्ट पाहा व डाउनलोड करा:
- “View” बटणावर क्लिक केल्यानंतर काही वेळ थांबा.
- खाली लाभार्थ्यांची यादी दिसेल, ज्यामध्ये लाभार्थींची नावे आणि इतर तपशील असतील.
- लिस्ट PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
ई रिक्षा योजना लिस्ट pdf डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्जाची स्थिती कशी तपासाल?
- डाव्या बाजूला “Track Application” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक व मोबाईल नंबर टाकून अर्जाची स्थिती तपासा.
- अर्ज “Pending” असल्यास पुढील लिस्टमध्ये तुमचा नंबर लागू शकतो.
नवीन अर्ज प्रक्रिया:
ज्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी १ एप्रिल २०२४ पासून evehicleform.mshfdc.co.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. १००% दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
योजना अंमलबजावणी:
या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना पर्यावरणपूरक फिरत्या दुकानांचे वाहन (ई-रिक्षा) वितरित केले जाईल. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात असून, २०२३-२४ मध्ये ६६७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
टीप:
- पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी आणि यादी तपासण्यासाठी वरील लिंकचा वापर करावा.
- जे लाभार्थी १००% अपंगत्वाचे निकष पूर्ण करत नाहीत, त्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केले जातील.
अधिक माहितीसाठी:
योजनेशी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्या आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
योजनेचे नाव | Divyang e rickshaw yojana 2024 |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | राज्य सरकार |
योजनेचा उद्देश काय आहे? | दिव्यांगांना म्हणजेच अपंगांना मोफत ई रिक्षा उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | राजयोतील दिव्यांग नागरिक |
लाभ | मोफत ई-रिक्षा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | https://evehicleform.mshfdc.co.in/ |
अधिक माहितीसाठी :- | येथे क्लिक करा |
विविध योजनेसाठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी खालील विडिओ पहा , Video Credit :- Marathi Corner
FAQ’s
दिव्यांग ई-रिक्षा योजनेची यादी कुठे पाहता येईल?
यादी evehicleform.mshfdc.co.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता व डाउनलोड करता येईल.
यादी डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय आहे?
वेबसाईटवर “See Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करा, तुमचा डिव्हिजन आणि जिल्हा निवडा, आणि यादी डाउनलोड करा.
अर्जाची स्थिती कशी तपासायची?
“Track Application” या पर्यायावर क्लिक करून अर्ज क्रमांक व मोबाईल नंबर टाकून स्थिती तपासा.
नवीन अर्ज कधी भरता येतील?
१ एप्रिल २०२४ पासून नवीन अर्ज ऑनलाईन करता येतील.
योजनेसाठी पात्रता काय आहे?
१००% दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना योजनेत प्राधान्य दिले जाते.